RTI Drafting Service's

Anonymous RTI application format in Marathi

आपलं नाव गुप्त ठेवायचं आहे तर चिंता करू नका. आपल्याला माहिती अधिकार अर्ज दाखल करणे असुरक्षित वाटत असल्यास आपण निनावी अर्ज दाखल करू शकतात. Anonymous RTI application format in Marathi

आता कोणत्याही भितीशीवाय निनावी माहिती अधिकार अर्ज दाखल करा. आम्ही सर्व सन्माननीय माहिती अधिकार वापरकर्त्यांसाठी माहिती अधिकार अर्ज मसुदा सेवेमध्ये निनावी अर्ज दाखल करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. Anonymous RTI application format in Marathi

तुम्ही दाखल केलेले निनावी अर्ज आम्ही आमच्या प्रतिनिधी मार्फत दाखल करू. वर्तमान पत्रांच्या माहिती नुसार दर वर्षी देशभरात 100 पेक्षा जास्त माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर हल्ले होतात काही मारले जातात तर काहींना धमकी दिली जाते. सदर बाबिंचा विचार करून ही सुविधा आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत.

यासाठी पर्याय म्हणून आम्ही तुमच्या वतीनं माहिती अधिकार अर्जाचा योग्य मसुदा तयार करून अर्ज दाखल करू, याचा आपल्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेऊ. आमचे अनुभवी माहिती अधिकार वापरकर्ते आपल्याला कसलाही त्रास न होऊ देता हवी असलेली माहिती मिळावी म्हणून स्वतःच्या जवाबदारी वर सावधानी पूर्वक प्रयत्न करतील.

निनावी माहिती अधिकार अर्जा बाबत काही सामान्य प्रश्न Anonymous RTI application format in Marathi Faq

1) RTI Drafting Service’s माझी वयक्तिक माहिती मागेल का?

तुम्ही  फक्त संपर्कासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक किंवा ईमेल आयडी द्यावी याव्यतिरिक्त कोणताही तपशिल देण्याची गरज नाही.

2) यामध्ये अजुन काय समाविष्ट आहे?

मसुदा शुल्क, प्रक्रिया शुल्क, प्रिंटिंग शुल्क, शासकीय शुल्क व नोंदणीकृत टपाल/स्पीड पोस्ट शुल्क याचा समावेश आहे.

3) मला माहिती कशी मिळेल?

व्हॉट्स ॲप क्रमांक किंवा ईमेल आयडी वर जन माहिती अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती आपणास देण्यात येईल.

4) निनावी माहिती अधिकार अर्ज प्रक्रिया प्रभावी असेल का?

आम्हाला आपले खरे नाव किंवा पत्ता माहीत करून घेण्याची आवश्यकता नाही. आम्ही आमच्या अनुभवी माहिती अधिकार वापरकर्त्याच्या नावे संबंधित कार्यालयात अर्ज सादर करतो व आपल्यासाठी माहिती मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करतो.

5) आम्ही आपल्याकडून अर्ज मसुदा शुल्क का घेतो?

वरील संदर्भ क्रमांक 2 मध्ये दर्शविलेल्या शुल्का सह आम्ही माहिती मिळवण्यासाठी पैसा, वेळ, प्रयत्न आणि संसाधन खर्च करतो.

6) आमच्या सेवा का घ्याव्यात?

• हे आपल्या साठी गतिशिल आणि विश्वसनीय प्रक्रिया पार पाडते जी की किफायतशीर आहे.
• आपण आमच्या व्यावसायिक व अनुभवी सेवेच्या माध्यमातून जलद गतीने माहिती मिळऊ शकतात.
• ही सेवा आपल्याला माहिती अधिकार कायद्याचा वापर करण्यासोबतच पैसा, वेळ, प्रयत्न आणि संसाधनावर होणाऱ्या खर्चाची बचत करते.

7) ही सेवा आपल्याला माहिती मिळून देण्याची हमी देते, परंतु माहिती विहित वेळेत न मिळाल्यास पुढील प्रक्रिया काय असेल?

अर्ज दाखल केल्यानंतर 30 दिवसात माहिती मिळण्याची प्रक्रिया शासकीय कार्यालयाकडून पूर्ण होणे अपेक्षित आहे. तथापि असे न झाल्यास अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत किंवा प्रतिसाद मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत आपल्याला प्रथम अपील प्रक्रिये मध्ये जावे लागेल.

त्यासाठी आपल्याकडून प्रथम अपील प्रक्रियेसाठी शुल्क भरणे अपेक्षित असेल.

8) प्रथम अपील प्रक्रिये नंतर जन माहिती अधिकारी यांनी माहिती न दिल्यास?

प्रथम अपील दाखल केल्यानंतर 45 दिवसांच्या आत कसलाही प्रतिसाद न मिळाल्यास किंवा माहिती मिळण्यास नकार मिळाल्यास, त्यापुढील 90 दिवसांच्या आत द्वितीय अपील प्रक्रिये मध्ये जावे लागेल.

द्वितीय अपील मान्य न झाल्यास किंवा निकाल आपल्या बाजूने न लागल्यास प्रथम अपील व द्वितीय अपील प्रक्रियेतील प्रत्येकी 40 टक्के शुल्क परत करण्यात येईल.

9) माहिती मिळणार असल्यास किंवा माहितीचे शुल्क भरावयाचे असल्यास ते कोण भरेल?

शक्य तो माहिती ही pdf file स्वरूपात किंवा डिजिटल स्वरूपात मागण्यात येते. जेणेकरून अतिरिक्त शुल्काचा भर पडणार नाही, परंतु माहिती ही pdf file स्वरूपात किंवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध न झाल्यास माहितीचे शुल्क आपणाकडून आकारण्यात येईल.

याव्यतिरिक्त इतर प्रश्न पडल्यास कृपया येथे दाखल करा.