मुंबईत घर घेणाऱ्यांची ‘या’ भागाला सर्वाधिक पसंती! तुमचं पुढचं घर याच भागात असावं का? लगेच वाचा!

Mumbai real estate : गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत घर(1 BHK flat Mumbai) खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे . विशेष म्हणजे पश्चिम उपनगरांमध्ये घर घेणाऱ्यांची संख्या वाढली असली, तरी अंधेरी (Andheri) आणि आसपासच्या परिसराला सर्वाधिक मागणी मिळाल्याचं चित्र आहे. याच काळात बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही मालमत्ता खरेदीसाठी अंधेरीलाच प्राधान्य दिलं आहे. एक खासगी रिअल इस्टेट संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत बॉलीवूड सेलिब्रिटींनी सुमारे 700 कोटी रुपयांची गुंतवणूक मुंबईतील मालमत्तांमध्ये केली असून, त्यातील तब्बल 450 कोटींची गुंतवणूक केवळ अंधेरी आणि त्याच्या आसपासच्या परिसरात करण्यात आली आहे.

प्रवास झाला सोपा, पश्चिम उपनगरांचा वापर वाढला

गेल्या दीड वर्षांमध्ये मुंबईत जेवढ्या घरांची विक्री झाली, त्यापैकी तब्बल 53 टक्के घरांची खरेदी ही पश्चिम उपनगरांमध्येच झाली आहे. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये झालेली प्रगती. मागील काही वर्षांपासून सुरू असलेली मोठी विकासकामं आता पूर्ण होऊन प्रत्यक्ष वापरात आली आहेत, त्यामुळे पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक सोयीचा आणि वेगवान झाला आहे.

पश्चिम उपनगरांमध्ये प्रवास आता पूर्वीपेक्षा खूपच सुलभ झाला आहे, त्यामुळे वेळेचीही चांगली बचत होतेय. याचबरोबर या भागात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचं कामही जोरात सुरू आहे, त्यामुळे परिसराचं रूपही झपाट्याने बदलत आहे.

लोकांमध्ये पश्चिम उपनगरांबद्दल विशेष आकर्षण

घर खरेदीसाठी मुंबईकरांचा कल पश्चिम उपनगरांकडे झुकलेला दिसतो, आणि त्यामागे अनेक कारणं आहेत. विशेष म्हणजे अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. या भागात तब्बल 12 हजार नवी घरं आणि साडेतीन हजार नव्या कार्यालयांची उभारणी झाली आहे. त्यामुळे हा भाग आता राहण्यासाठीच नव्हे, तर कामासाठी देखील आकर्षक ठरत आहे.

येथे वाचा – खुशखबर! म्हाडाच्या घरांचा ‘फॉर्म्युला’ बदलणार! मुंबईतील घर घेणे आता सर्वांना परवडणार..!

अंधेरी परिसरात अनेक नामवंत खाजगी बिल्डर्सनी (builders) केवळ घरांचंच नव्हे, तर आलिशान व्यावसायिक इमारतींचंही बांधकाम केलं आहे. बॉलीवूडचं बहुतांश कामकाज पश्चिम उपनगरांतून चालत असल्यामुळे अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अंधेरीमध्ये स्वतःचं ऑफिस घेतले आहे. विशेष म्हणजे ओशिवरा येथील एका प्रीमियम इमारतीत बिग बी अमिताभ बच्चन, अजय देवगण, काजोल आणि कार्तिक आर्यन यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपापली कार्यालयं विकत घेतली आहेत.

Leave a Comment