about us right to information in Marathi
यामध्ये नागरिकांच्या समस्या व्यवस्थित समजुन घेऊन योग्य नमुना अर्ज तयार करून मार्गदर्शन व सल्ला पुरवणे.
ही सेवा फक्त अश्या नागरिकांसाठी आहे ज्यांना माहिती अधिकार अर्ज दाखल करण्याचे पुरेसे ज्ञान नाही किंवा अर्ज दाखल करून देखील संबंधित प्राधिकरण यांच्याकडुन विहित मुदतीत उत्तर/प्रतिसाद मिळत नाही. माहिती अर्ज योग्य नमुन्यात नाही म्हणुन अर्ज नाकारले गेले आहे किंवा इतर कारण सांगुन माहिती नाकारली गेली आहे.
about us right to informatiohin in Marat
आम्ही पुढील प्रमाणे अर्ज मसुदा सेवा पुरवतो.
जोडपत्र अ दाखल करणे:- सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडुन माहिती मिळवायची असल्यास.
जोडपत्र ब दाखल करणे:- जन माहिती अधिकारी यांच्याकडुन उत्तर न मिळाल्यास किंवा माहिती नाकारल्यास.
जोडपत्र क दाखल करणे:- प्रथम अपिलीय अधिकारी यांनी सुनावणी घेऊन आदेश पारित न केल्यास किंवा माहिती मिळऊन न दिल्यास.
माहिती आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज करणे: जन माहिती अधिकारी यांच्याकडुन उत्तर न मिळाल्यास किंवा माहिती नाकारल्यास, किंवा अर्ज न स्वीकारल्यास
about us right to information in Marathi
(कृपया लक्षात असूद्या तक्रार अर्ज दाखल केल्यास माहिती मिळण्याची शक्यता कमी असते परंतु जन माहिती अधिकारी यांच्यावर शस्तीची/शिस्त भंगाची कार्यवाही होऊ शकते)
आपल्याला हव्या असलेल्या विषयाशी संबंधित योग्य अर्ज मसुदा हवा असल्यास येथे क्लिक करा.