म्हाडाची मोठी ऑफर! अर्ज करा आणि स्वप्नातील घर मिळवा..

MHADA Flat registration : घर घेताना फक्त चार भिंती पुरेश्या नसतात, बरं का! घर हवं तर काय असायला हवं? प्रशस्त जागा, चांगली हवा, भरपूर सूर्यप्रकाश, वास्तू प्रसन्न असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला परवडणारी किंमत असावी. पण असं सगळं मिळणं म्हणजे नशिबाची गोष्ट वाटते, हो ना? म्हणूनच म्हाडाने स्वस्त घराच्या (Affordable flat) शोधात भटकणाऱ्या लोकांसाठी एक सोप्पा आणि फायदेशीर पर्याय आणला आहे. म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आता MHADA करणार आहे. चला जाणून घेऊया तुमच्या फायद्याची बातमी. (Mhada Flats online registration 2025)..

जो पहिला येणार, त्याला घर मिळणार (Mhada Flat)

MHADA च्या पुणे मंडळातर्फे एक खास उपक्रम सुरू झाला आहे. यामध्ये आधीच्या काही सोडतीत उरलेली घरं आता “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” या तत्वावर विकली जात आहेत. म्हणजे इथे कोणतंही लॉटरीचं टेन्शन नाही, जे लवकर अर्ज करतील, त्यांना सर्वात अगोदर संधी मिळेल.

नोंदणी सुरू झाली आहे, आता अजून वाट पाहू नका!

या स्कीमचा पहिला टप्पा 10 एप्रिल 2025 पासून सुरू झाला आहे, आणि दुसरा टप्पा 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे, त्यामुळे तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता. नोंदणी करण्यासाठी तुम्ही https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune म्हाडाच्या या अधिकृत लिंकचा वापर करू शकता.

घराची किंमत किती आणि प्रक्रिया कशी असेल?

सध्या MHADA ने नेमकी किती घरं आहेत, हे स्पष्ट केलं नसल्याने थोडी उत्सुकता आहेच. पण यामध्ये घर (Mhada Flat) हवं असेल तर सुरुवातीला थोडी अनामत रक्कम भरावी लागेल. एकदा घर निवडलं की, 48 तासांच्या आत अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह फी भरायची आहे. सगळी प्रक्रिया अगदी पारदर्शक आणि ऑनलाईन होणार आहे. रक्कम भरून झाल्यानंतर याची पुष्टी ऑनलाईन पद्धतीनंच होईल.

मागच्यावेळी संधी हुकली.. पण आता यावेळी गमावू नका!

मागच्या वेळी म्हाडाच्या लॉटरीत (Mhada) सहभागी होऊनही जर तुमचं नशीब चमकलं नसेल, तर आता पुन्हा नशीब आजमावून पाहण्याची वेळ आली आहे. MHADA च्या या योजनेमुळे पुण्यासारख्या महागड्या आणि महत्त्वाच्या भागात घर घेणं आता सामान्य माणसासाठीही शक्य होणार आहे.

येथे वाचा – मुंबईकरांनो! नवीन प्रकल्पात घर घेताय का? जरा थांबा… त्याआधी समजून घ्या हा नवीन नियम, नाहीतर होईल पश्चाताप..!

4 thoughts on “म्हाडाची मोठी ऑफर! अर्ज करा आणि स्वप्नातील घर मिळवा..”

Leave a Comment