पुण्यात या 10 ठिकाणी मिळतात एकदम स्वस्तात घरं; कमी बजेटमध्ये मस्त घर..!

Top 10 Affordable Localities area Pune : पुणे शहर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात लोकप्रिय शहर आहे, हे आपल्याला माहीतच आहे. शिक्षणासाठी तर पुण्याचं नाव अगदी पहिल्यांदा घेतलं जातं. शिक्षणामुळेच या शहराला विद्येचे माहेरघर म्हटलं जातं. कारण इथे असंख्य महाविद्यालयं आहेत. पण शिक्षणापुरतं मर्यादित न राहता पुणे आता आयटी आणि उद्योगांचंही मोठं केंद्र बनत चाललंय. इथे मोठमोठ्या आयटी कंपन्या आहेत, आणि हजारो औद्योगिक कंपन्याही कार्यरत आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी हजारो लोक रोज पुण्यात स्थलांतर करत आहेत. पुण्यात लोकांची संख्या वाढतेय, यामुळे साहजिकच पुण्यात घरांची मागणी दिवसेंदिवस वाढतेय. आता प्रश्न असा की, पुण्यात घर (1BHK Flat Pune) घ्यायचं तर सर्वात स्वस्त आणि परवडणारा एरिया कोणता? चला, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पुणे हे सध्या वेगानं वाढणारं आणि झपाट्यानं विकसित होणारं शहर आहे. त्यामुळे आता इथल्याही घरांच्या किंमती मुंबईसारख्याच गगनाला भिडायला लागल्या आहेत. आज पुण्यालाही मेट्रो सिटीचं स्थान मिळालं आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही काही उच्चभ्रू भाग आहेत, ज्या ठिकाणी अनेक श्रीमंत व्यक्तींचे घर आहे. पण जर तुमचं बजेट थोडं कमी असेल, तरी काळजी करू नका, पुण्यात असेही अनेक भाग आहेत जिथे तुम्हाला परवडणाऱ्या दरात घर भाड्याने किंवा विकत घेता येईल (Affordable Homes Pune). उदाहरणच द्यायचं झालं तर – हडपसर, निगडी, येरवडा, डेक्कन रोड, नाना पेठ, लक्ष्मी रोड, तुळशीबाग हे काही चांगले पर्याय आहेत. या सगळ्या भागांमध्ये तुम्हाला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल, चांगल्या सुविधा असतील आणि राहणीमानही उच्च असेल.

(1) कात्रज

कात्रज हा भाग विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार आणि व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांसाठी अगदी परफेक्ट आहे. कारण काय तर, एक तर तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ आहे, त्यासोबतच तो थेट कोल्हापूर आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांना जोडतो. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांसाठी कात्रज एकदम सोयीचं आणि फायद्याचं ठरतं. अजून एक गोष्ट म्हणजे राजीव गांधी प्राणी उद्यान आणि सुंदर कात्रज तलावासाठी देखील कात्रज प्रसिद्ध आहे. याठिकाणी थोडा विरंगुळा घेण्यासाठी हे ठिकाण जवळच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याठिकाणी इतर लोकेशनच्या तुलनेत खूपच परवडणाऱ्या किमतीत निवासी फ्लॅट्स (Pune affordable flats) मिळतात. त्यामुळे बजेटमध्ये चांगलं घर शोधत असाल, तर कात्रज हा एक उत्तम पर्याय आहे.

(2) हिंजवडी

हिंजवडी म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर आयटी पार्क येतं, बरोबर ना? कारण हे पुण्याचं सगळ्यात मोठं आयटी हब आहे. इथं असलेल्या मोठमोठ्या आयटी कंपन्यांमुळे पुण्याचा विकास खरंतर झपाट्यानं झालाय. हिंजवडीमध्ये काम करणारे किंवा शिकणाऱ्या अनेक लोकांना शेअरिंग बेसिसवर राहायला आवडते. त्यामुळेच पुण्यात फ्लॅट भाड्याने घेण्याच्या बाबतीत हिंजवडी हे एक स्वस्त आणि सोयीचं ठिकाण मानलं जातं.

विद्यार्थ्यांसाठीही इथे खूप चांगले पर्याय आहेत. किफायतशीर पीजी आणि को-लिव्हिंग स्पेसेस याठिकाणी सहज मिळतात. म्हणजेच बजेटमध्ये राहायचं आणि आयटी हबच्या अगदी जवळ रहायचं असेल, तर हिंजवडी तुमची एकदम योग्य निवड म्हणल्या जाईल.

येथे वाचा – खुशखबर! आता म्हाडाचे घर झाले स्वस्त, येथे पहा नवीन किमती..!

(3) धनकवडी

धनकवडी हा पुण्याचा असा भाग आहे जिथं काही टॉपची महाविद्यालयं आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येत असतात. आता एवढे विद्यार्थी आले की, राहण्याची सोय तर हवीच ना? तर त्यासाठी धनकवडी एकदम परफेक्ट आहे. कारण हा परिसर राष्ट्रीय महामार्ग 4 जवळ आहे, त्यामुळे लोकेशनचं कनेक्टिव्हिटीचं याठिकाणी टेन्शनचं नाही. इथं परवडणाऱ्या दरात पीजी आणि शेअरिंग बेसिसवर फ्लॅट्स सहज मिळतात. म्हणजे बजेटला धक्का न लावता शिक्षण आणि राहण्याची सोय दोन्ही मिळते. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी हेसुद्धा एक हॉट आणि फेव्हरिट ठिकाण आहे.

(4) वारजे

वारजे हा मुठा नदीच्या काठावर वसलेला एक छानसा परिसर आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनही, मुख्य सिटीपासून फक्त 12 किमी अंतरावर आहे. म्हणजे फार लांबही नाही आणि गोंगाटातही नाही. इथली खासियत म्हणजे इथं घरं तुलनेने परवडणाऱ्या किमतीत मिळतात. त्यामुळे अनेक लोक भाड्याने राहण्यासाठी वारजेला प्राधान्य देतात. शांत वातावरण, चांगली कनेक्टिव्हिटी आणि बजेटमध्ये घर हे सगळंच याठिकाणी जुळून येतं.

(5) भोसरी

भोसरी म्हटलं की डोळ्यासमोर लगेच उद्योगधंद्यांचा परिसर येतो, बरोबर ना? कारण हे पुण्यातलं एक प्रसिद्ध औद्योगिक क्षेत्र आहे. इथे टाटा मोटर्स, थरमॅक्स, एमआयडीसी यांसारखे मोठे उद्योग आहेत. म्हणजेच याठिकाणी रोज हजारो लोक कामासाठी येत असतात. आता कामाचं ठिकाण जवळ असेल आणि घर परवडणारं असेल, तर अजून काय हवं? म्हणूनच भोसरीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती तयार झाल्या आहेत. इथं तुलनेने स्वस्तात फ्लॅट्स सहज मिळतात.

(6) भूगाव

भूगाव हा पुण्यातला एक शांत आणि परवडणारा परिसर आहे, जो मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या अगदी जवळ आहे. लोकेशनची सोय पाहिली तर एकदम मस्त, एक्सप्रेस वे जवळ असल्यामुळे शहरात येणं-जाणं अगदी सोपं होतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे, इथं घरं तुलनेत खूपच परवडणाऱ्या दरात मिळतात. म्हणजेच शांत परिसर त्यासोबतच चांगली कनेक्टिव्हिटी आणि बजेटमध्ये घर.

(7) लोहेगाव

लोहेगाव हा पुण्याच्या विमानतळाजवळचा एक परवडणारा आणि लोकप्रिय परिसर आहे. लोकांना इथं राहायला आवडतं, कारण लोकेशन जबरदस्त आहे. त्यासोबतच पुणे-अहमदनगर आणि पुणे-सोलापूर या दोन्ही महामार्गांमुळे शहराच्या इतर भागांशी मस्त कनेक्टिव्हिटी मिळते. आणि हो, इथं घरांच्या किमती अजून देखील खिशाला परवडणाऱ्या आहेत. म्हणजेच, प्रवासासाठी सोयीचं आणि बजेटमध्येही फिट बसणारं ठिकाण हवं असेल, तर लोहेगाव नक्कीच विचार करण्यासारखं आहे.

येथे वाचा – जनतेला लागली 35 लाख घरांची लॉटरी; प्रत्येकाला मिळणार घर, पहा सरकारची योजना..!

8. वाघोली

वाघोली हे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने एकदम भारी ठिकाण आहे, कारण हे लोकेशन पुणे-अहमदनगर महामार्गाशी जोडलेलं आहे. त्यामुळे शहरात येणं जाणं अतिशय सोपं होतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे, इथे तुलनेत सहज बजेटमध्ये घर मिळतं. 

9. खराडी

खराडी हे पूर्व पुण्यातलं एक झपाट्यानं वाढत असलेलं आणि परवडणारं ठिकाण आहे. विशेषतः कुटुंबांसाठी आणि तरुण प्रोफेशनल्ससाठी हे ठिकाण खूपच लोकप्रिय आहे. इथे भाड्याने घर (Home on Rent)  मिळवणं सोपं आहे आणि दरही वाजवी आहेत. 

10. चाकण

चाकण हा पश्चिम पुण्यातला एक झपाट्यानं वाढणारा आणि लोकप्रिय भाग आहे. तो नाशिक-पुणे एक्सप्रेस वेला लागून आहे, त्यामुळे या लोकेशनचे प्रचंड फायदे मिळतात. सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे याठिकाणी अगदी कमी किमतीत छान, अलिशान घरं सहज मिळू शकतात! म्हणजेच बजेटमध्ये लक्झरी फील हवी असेल, तर चाकण (Chakan) नक्कीच एक जबरदस्त पर्याय आहे.

Leave a Comment