RTI Drafting Service's

माहिती अधिकार अर्ज नमुने

आपला अधिकार, माहितीचा अधिकार!

Sample of online rti application

आपल्याला कुठे? काय? कोणती? माहिती मागायची कळत नाहीये, तर मग चिंता करण्याचे काही एक कारण नाही, आम्ही घेऊन येत आहोत सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित माहिती अधिकार अर्ज नमुने.

M-RTI-1 कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती मिळवा.

M-RTI-2 अर्ज/तक्रार/निवेदन याच्यावर केलेल्या कार्यवाहीचा तपशील मिळवा.आपण दाखल केलेल्या तक्रार ,निवेदन अर्जावर कार्यवाही झालेली नसल्यास, या अर्जाद्वारे केलेल्या कार्यवाहीचा तपशील मागवा. सदर अर्जाचा संदर्भ द्यावा.व दाखल केलेल्या तक्रार,निवेदन याची झेरॉक्स सोबत जोडावी

M-RTI-3 FIR -NCR वर केलेल्या कार्यवाही चा तपशील मिळवा. सदर अर्ज संबंधित उपविभागीय अधिकारी यांचे कडे दाखल करावा किंवा जेथे FIR/NCR दाखल केलेली आहे तेथे पण अर्ज दाखल करू शकतात.

M-RTI-4 आमदार / खासदार किंवा इतर विकास निधी शी संबंधित माहिती मिळवा.आमदार/खासदार विकास निधिशी संबंधित माहिती मागावा.

M-RTI-5 विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा. (Estimate copy) विकास काम ज्या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे त्यांच्याकडे अर्ज सादर करावा. ज्या कामाचे अंदाज पत्रक हवे आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा.

ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित 45+ महत्त्व पूर्ण माहिती अधिकार अर्ज नमुने

 

नगर परिषद कार्यालयाशी संबंधित महत्त्व पूर्ण 80+ माहिती अधिकार अर्ज नमुने..

 

बांधकाम विभागाशी संबंधित 10 माहिती अधिकार अर्ज नमुने

 

प्रथम अपील व द्वितीय अपील अर्ज, निवेदन व दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत करावयाचे तक्रार अर्जाचे नमुने..

 

Sample of online rti application

M-RTI-6 मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा (MB). ज्या कार्यालयाच्या नियंत्रणात विकास काम करण्यात येत आहे तेथे अर्ज सादर करावा.

M-RTI-7 कार्यालयाचा अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल मिळवा.शक्यतो प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण यांचे लेखा परिक्षण होते. त्यामध्ये सर्व आर्थिक व महत्त्वपुर्ण बाबींचा समावेश असतो.

M-RTI-8 विविध योजनांशी संबंधित माहिती मिळवा. योजना ज्या कार्यालयामार्फत राबवण्यात येईल त्या कार्यालया त अर्ज दाखल करू शकता माहितीचा विषय यामध्ये आपल्याला हव्या असलेल्या योजनांचे नाव लिहावे. व त्यामध्ये आपल्या सोई नुसार बदल करायचा असल्यास तो करावा.

M-RTI-9 ग्रामपंचायत दस्तऐवज यांचे निरीक्षण. १)सामान्य रोकड नोंदवही. २)प्रमाणके/देयके नोंदवही. ३)साठा लेखा नोंदवही. ४)कामाचा अंदाज व मोजमाप नोंदवही.

M-RTI-10 स्वस्त धान्य लाभार्थी यादी व इतर तपशील यामध्ये कार्डधारकाना देण्यात येणाऱ्या लाभाचा अधिक तपशील मिळवा. व त्यासंबंधी विविध दस्तऐवज यांची माहिती मिळवा.

Sample of online rti application

M-RTI-11 विकास कामाचा तपशील मिळवा यामध्ये शासकीय कार्यालयाने केलेल्या कामाची माहिती मिळवा, विकास कामाचे नाव माहीत असणे आवश्यक आहे.

M-RTI-12 विकास कामांची यादी व इतर माहिती मिळवा. यामध्ये शासकीय कार्यालयाने केलेल्या सर्व विकास कामांची सविस्तर माहिती मिळवा.

M-RTI-13 स्वस्त धान्य दुकान यांची सामाजिक अंकेक्षनाची प्रत मिळवा. सामाजिक अंकेक्षण (Social Audit) चे लाभ.

रेशन दुकानातील काळा बाजार थांबवण्यासाठी गावातील किंवा रेशन दुकानाच्या हद्दीतील जागरूक नागरिकांनी सामाजिक अंकेक्षण (Social Audit) करायला पुरवठा विभागाला भाग पडायला हवे.

स्वस्त धान्य दुकान चे सामाजिक अंकेक्षण (Social Audit) केल्यास मिळणारे लाभ

१) रेशनकार्डधारकांना व गावकर्यांना पुरवठा विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती उपलब्ध होईल.

२) रेशनकार्डधारकांना विविध योजनेच्या धान्याचा दर व परिमाण याची माहिती उपलब्ध होईल.

३) रेशनकार्डधारकांना गावातील योजनानिहाय शिधापत्रिका धारकांची संख्या व यादी याबाबतची माहिती उपलब्ध होईल.

४) रेशनकार्डधारकांना शिधावाटप दुकानाच्या वेळेबाबत माहिती उपलब्ध होईल.

५) रेशनकार्डधारकांना प्राप्त झालेले धान्य व विक्री केलेल्या धान्याबाबत माहिती उपलब्ध होईल.

६) शिधावाटप दुकानांच्या धान्य वितरणात #पारदर्शकता निर्माण होईल.

७) शिधावाटप दुकानातून होणारा धान्याचा काळाबाजार व गैरव्यवहार रोखण्यास मदत होईल.

८) रेशनकार्डधारकांमध्ये पुरवठा विभागाबाबत जागृती होऊन सकारात्मक भावना निर्माण होईल व रेशनकार्डधारकांचा पुरवठा विभागाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.

M-RTI-14 ग्रामसभा इतिवृत्ताची माहिती मिळेल, ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाची माहिती मिळेल, ग्रामसभेत उपस्थितांची माहिती मिळेल.

M-RTI-15 निविदा बाबत तपशिल मिळवा.सदर अर्ज अश्या सार्वजनिक प्राधिकरणात दाखल करू शकतात.जेथे निविदा प्रक्रिया राबवण्यात येते.

Sample of online rti application

M-RTI-16 रस्ते कामांची माहिती मिळवा.यामध्ये कामांची यादी, अंदाजपत्रक व मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा.

M-RTI-17 ग्रंथालय बाबत माहिती मिळवा यामध्ये अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक ग्रंथालय यांची माहिती मिळवा.

M-RTI-18 नोंदणीकृत सावकारांबद्दल माहिती मिळवा. नोंदणीकृत सावकारांची माहिती, अवैध्य सावकारीला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचा तपशिल मिळवा.

M-RTI-19 संचिकेची/फाईल ची प्रत मिळवा

M-RTI-20 उत्तर पत्रिकेची प्रत मिळवा

M-RTI-21 सेवा पुस्तिका (अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबींचा तपशिल

M-RTI-22 प्रलंबित फेरफार बाबतचा तपशिल

M-RTI-23 नोंदवही, दस्तऐवज, फाईल चे निरक्षण मिळवा

M-RTI-24  बँक मधील पीक कर्ज योजनेचा तपशील मिळवा

 

M-RTI-25 विकास कामांची यादी प्रगती अहवाल या बाबत तपशिल मिळवा.

 

M-RTI-26 किरकोळ दुरुस्ती च्या कामांची माहिती मिळवा..

अर्ज नमुने मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

 Sample of online rti application

1 thought on “माहिती अधिकार अर्ज नमुने”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *