RTI Drafting Service's

स्वस्त धान्य दुकाने सामाजिक अंकेक्षण

रेशन दुकानातील काळा बाजार थांबवण्यासाठी गावातील किंवा रेशन दुकानाच्या हद्दीतील जागरूक नागरिकांनी सामाजिक अंकेक्षण (Social Audit) करायला पुरवठा विभागाला भाग पडायला हवे. Ration card social audit

स्वस्त धान्य दुकान चे सामाजिक अंकेक्षण (Social Audit) केल्यास मिळणारे लाभ

१) रेशनकार्डधारकांना व गावकर्यांना पुरवठा विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती उपलब्ध होईल.

२) रेशनकार्डधारकांना विविध योजनेच्या धान्याचा दर व परिमाण याची माहिती उपलब्ध होईल.

३) रेशनकार्डधारकांना गावातील योजनानिहाय शिधापत्रिका धारकांची संख्या व यादी याबाबतची माहिती उपलब्ध होईल.

४) रेशनकार्डधारकांना शिधावाटप दुकानाच्या वेळेबाबत माहिती उपलब्ध होईल.

५) रेशनकार्डधारकांना प्राप्त झालेले धान्य व विक्री केलेल्या धान्याबाबत माहिती उपलब्ध होईल.

६) शिधावाटप दुकानांच्या धान्य वितरणात #पारदर्शकता निर्माण होईल.

७) शिधावाटप दुकानातून होणारा धान्याचा #काळाबाजार व गैरव्यवहार रोखण्यास मदत होईल.

८) रेशनकार्डधारकांमध्ये पुरवठा विभागाबाबत जागृती होऊन सकारात्मक भावना निर्माण होईल व रेशनकार्डधारकांचा पुरवठा विभागाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.

आपण सामाजिक अंकेक्षण Ration card social audit याची प्रत माहिती अधिकार अर्ज करून मागून घ्यावी, काही निवडक माहिती अधिकार अर्ज नमुने येथे मिळऊ शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *