म्हाडाचा फॉर्म भरायचा? तर मग या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा, पहा एका क्लिक वर..!

Mhada Lottery 2025 : स्वतःचं हक्काचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण मुंबईसारख्या महागड्या शहरात घर घेणं सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. घरांचे दर इतके वाढलेत की ते बघूनच निर्णय मागे घेतले जातात. अशा परिस्थितीत ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये घर घेण्याची सुवर्णसंधी आता तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने तब्बल 5,632 सदनिका आणि 77 भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. यामध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांतील इच्छुकांसाठी घरे उपलब्ध असून, अनेक जणांचं ‘स्वप्नातलं घर’ आता वास्तवात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

म्हाडा, सिडकोसारख्या सरकारी संस्था नेहमीच सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरं मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. म्हणूनच दरवर्षी हजारो लोक आशेने या योजना आणि लॉटऱ्यांकडे पाहत असतात. अलीकडेच कोकण मंडळाकडून ठाणे शहर आणि जिल्ह्यातील घरांसाठी नवी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्यांनी काही महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे. (Mhada Lottery 2025 Important dates)..

म्हाडा लॉटरी 2025 : लक्षात ठेवा या महत्त्वाच्या तारखा!

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? मग खाली दिलेल्या तारखा नक्की लक्षात ठेवा…

(1) अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 ऑगस्ट 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार.
(2) ठेव रक्कम भरण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत
(3) पात्र अर्जदारांची पहिली यादी जाहीर होणार : 21 ऑगस्ट 2025, सायंकाळी 6 वाजेपर्यंत
(4) दावे, हरकती दाखल करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2025, सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार..
(5) पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर होणार : 1 सप्टेंबर 2025, सायंकाळी 6 वाजेपर्यंत
(6) लॉटरीचा निकाल (ड्रॉ) : 3 सप्टेंबर 2025 रोजी, सकाळी 10 वाजता.
(7) ठिकाण : काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ही माहिती लक्षात ठेवा आणि आपल्या मित्र व नातेवाईकांना शेअर करा..

येथे वाचा – सुवर्णसंधी! नवी मुंबईत फक्त 14 लाखांपासून म्हाडाचे घर, पहा लोकेशननुसार सर्व घरांच्या किमती..!

Leave a Comment