खुशखबर! आता म्हाडाचे घर झाले स्वस्त, येथे पहा नवीन किमती..!

आजच्या झपाट्यानं वाढणाऱ्या शहरी जीवनात स्वतःचं हक्काचं घर (1BHK Flat) असणं हे प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न बनलं आहे. पण शहरातील घरांच्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या किमती आणि खासगी बिल्डरांची स्पर्धा बघता, हे स्वप्न गाठणं कठीण वाटतं. अशा वेळी म्हाडा (Mhada Scheme) ही सरकारी संस्था सामान्य लोकांसाठी एक मोठा दिलासा ठरते. म्हाडाच्या गृह योजना खूपच परवडणाऱ्याच असतात, त्यामुळे खासगी बिल्डरपेक्षा म्हाडाचे घर (Mhada Flat) घेण्याचा प्रयत्न लोक करत असतात. कारण म्हाडा योजनेमुळेच मेट्रो शहरांत घर घेण्याची संधी मिळते. शहरातील गरजू, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी म्हाडाची घरे म्हणजे खरं तर एक संधीच आहे. आता पुन्हा एकदा म्हाडाने एक आनंदाची बातमी दिली आहे. म्हाडाने आता आपल्या घरांच्या किमती स्वस्त केल्या आहेत. चला जाणून घेऊया म्हाडाच्या घराच्या नवीन किमती.

6,248 घरांच्या किमती झाल्या कमी 

गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये म्हाडाने पीएम आवास योजना (शहरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोण आणि खोणी भागात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर तब्बल 6,248 घरे उपलब्ध करून दिले होते. आता या घरांच्या किमती म्हाडाने कमी केल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शिरढोण या लोकेशन वरील अत्यल्प उत्पन्न गटातील 5,236 एवढ्या घरांची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे. प्रती सदनिका 1 लाख 43 हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत. या प्रस्तावाला मालाची उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर आता येथील एका घराची किंमत 19 लाख 28 हजार एवढी झाली आहे. त्यासोबतच खोणी येथील अत्यल्प उत्पन्न गटातील 1 हजार 12 एवढ्या घरांची विक्री किंमत प्रती सदनिका 1 लाख 1 हजार 800 एवढ्या रुपयांनी कमी झाली आहे. आता येथील घराची नवीन किंमत 19 लाख 11 हजार 700 रुपये एवढी झाली आहे.

येथे वाचा – जनतेला लागली 35 लाख घरांची लॉटरी; प्रत्येकाला मिळणार घर, पहा सरकारची योजना..!

Leave a Comment