CIDCO Housing Lottery : मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण या भागात घरांच्या किमती इतक्या जास्त आहेत की, अनेकांचं हे स्वप्न अपूर्णच राहतं. सरकार म्हाडा आणि सिडकोद्वारे परवडणारी घरे (Affordable Flats) उपलब्ध करतं, पण यातील हजारो घरांसाठी लाखो अर्ज येऊन पडतात. त्यामुळे अनेक वर्षं प्रयत्न करूनही स्वतःचं घर मिळणं कठीण होतं. मात्र आता अशा परिस्थितीत एक चांगली बातमी आली आहे. सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये हजारो कुटुंबांना स्वस्तात घर मिळू शकते. (CIDCO big lottery coming soon, houses at low prices)
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार बैठक
मिळालेल्या माहितीनुसार, सिडको लवकरच नवी मुंबईत मोठी लॉटरी काढण्याच्या तयारीत आहे (Cidco Lottery Navi Mumbai). असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सरकारने त्वरित निर्णय घेतल्यास सिडकोद्वारे ही जम्बो लॉटरी जाहीर होऊ शकते. सिडकोच्या घरांच्या (Cidco Flats) किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लवकरच होणार आहे. त्यामुळे आता लवकरच घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सर्व काही योजनेनुसार झाल्यास, सिडको प्रशासन लवकरच महालॉटरी जाहीर करू शकते, अशी आशा आहे.
सिडकोच्या अधिकाऱ्याचं नेमकं म्हणणं काय?
सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सरकारने घरांच्या किमतींबाबत योग्य तोडगा काढल्यास आम्ही लॉटरी जाहीर करण्यास पूर्णपणे तयार आहोत. सिडकोकडे 25 लाखांपर्यंतची घरे उपलब्ध आहेत, आणि घराची किंमत त्या घराच्या लोकेशनवर अवलंबून असते. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, बाजारातील किमतींच्या तुलनेत सिडकोची घरे (Cidco Flats) स्वस्तच आहेत. शिवाय, खासगी बिल्डर्सच्या इमारतींच्या तुलनेत सिडकोची घरे दर्जेदार देखील आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. यातून महालॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. ही लॉटरी प्रत्यक्षात आल्यानंतर हजारो लोकांना परवडणाऱ्या किमतीत स्वतःचं घर मिळू शकणार आहे. त्यामुळे हा निर्णय नेमका कधी होणार, याबाबत लवकरच स्पष्टता येईल, अशी अपेक्षा आहे.