BDD chawls redevelopment: कित्येक वर्षांपासून एकाच जागेवर, एकाच स्वप्नासोबत जगणाऱ्या हजारो बीडीडी रहिवाशांच्या आयुष्यात आता एक नवी पहाट उजाडणार आहे. विशेष म्हणजे, बीडीडीकरांचा यंदाचा गणपती अनेकांच्या नव्या फ्लॅट मधे विराजमान होणार आहे. चला जाणून घेऊया सविस्तर…
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा विषय गेली अनेक वर्षं सुरू असतानाही, त्याचं प्रत्यक्ष रूपांतर मात्र थोडं लांबणीवरच पडलं होतं. पण ही प्रतिक्षा शेवटी संपली आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा पहिला टप्पा हा १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणार असून, त्याच दिवशी ३,००० रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या मिळणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि म्हाडा यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरू असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा आता अंतिम टप्प्यात आला आहे. या अंतर्गत वरळी, नायगाव आणि इतर परिसरांतील जुन्या चाळी आता अत्याधुनिक इमारतींमध्ये रूपांतरित केल्या जात असून, पहिल्या टप्प्यातील 3,000 सदनिका ह्या अगदी पूर्णतः तयार झाल्या असल्याचं बघायला मिळत आहे.
म्हाडाचं घर मिळाल्यावर लगेच भाड्याने देता येतं का? पहा महत्वाचा नियम..!
या नव्या घरांमध्ये शुद्ध पाणी, स्वच्छतागृहं, विजेची योग्य व्यवस्था, लिफ्टसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. म्हणजेच या अनुषंगाने रहिवाशांच्या राहणीमानात देखील बदलच झाल्याचं बघायला मिळणार आहे. मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक मानल्या जाणाऱ्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला आता खऱ्या अर्थाने वेग येऊ लागला आहे. ब्रिटिश काळात उभारलेल्या या चाळी काळाच्या ओघात जीर्ण आणि धोकादायक ठरल्या. त्यामुळे त्यांची पुनर्रचना करणे गरजेचे होते.
पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होऊनही अनेक वर्षे बीडीडीकर घराचा ताबा मिळण्याची वाट बघत होते. मागील पाडव्यालादेखील त्यांना घरांचा अपेक्षित ताबा मिळू शकला नाही. त्यामुळे या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या अगोदर तरी नव्या घरात प्रवेश करता येईल का, असा प्रश्न विचारला गेला. आता मात्र बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
म्हाडाचा फॉर्म भरायचा? तर मग या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा, पहा एका क्लिक वर..!
या पार्श्वभूमीवर वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील बीडीडी रहिवाशांसाठी पुढाकार घेत ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलं आहे की, “माझ्या वरळी मतदारसंघातील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज-१ चे काम पूर्ण झाले आहे. डी आणि ई विंगसाठी भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असून, रहिवाशांना लवकरात लवकर घरांचा अधिकृत ताबा आणि चाव्या देण्यात याव्यात, यासाठी मी म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे.”
Nice