MHADA Lottery 2025 : मुंबई पुणे या शहरात आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. आता तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या म्हाडा योजना (Mhada Scheme) हा सर्वात खास पर्याय आहे. कारण म्हाडाची घरे (Mhada Flats) बाजारभावापेक्षा खूप स्वस्तात मिळतात, त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी म्हाडा योजना खूपच महत्वाची मानली जाते. सध्या 7 लाखांपेक्षा कमी किमतीत घर घेण्याची संधी म्हाडा तुम्हाला देत आहे. त्यामुळे तुम्ही या संधीचे सोनं करू शकता आणि आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता. इतके स्वस्त घर नेमकी कुठे आहे? आणि त्यासाठी अर्ज कुठे करावा? याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेऊया.
मुंबई पुण्यात सर्वसामान्य कुटुंबातील लोक परवडणाऱ्या दरात घर (affordable flats) शोधत असतात. आता जर तुम्हाला पुण्यात आपल्या हक्काचं घर विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. कारण म्हाडाच्या पुणे मंडळाने पुणे आणि आसपासच्या भागात घरांच्या विक्रीसाठी नवी लॉटरी (Mhada Lottery Pune) जाहीर केली आहे. यामध्ये तब्बल 4,186 घरांचा समावेश असून, त्यापैकी 1,982 घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या लॉटरीत सर्वात स्वस्त घर कुठे मिळणार? तसेच या घरांची किंमत आणि लोकेशन काय आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण खाली दिलेली आहे.
फक्त 6 लाख 95 हजारात घर
तुम्ही ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत घर घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. या योजनेतील सर्वात स्वस्त घर फक्त 7 लाखांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.
या योजनेचा संकेत नंबर 867-B आहे आणि ही योजना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात, चाकण येथे आहे. या योजनेचं नाव चाकण – ता. खेड, जि. पुणे सर्व्हे नं. 818 (PMAY) – 1 आरके 1 असं असून या घराची अंदाजे किंमत 6 लाख 95 हजार रुपये एवढी आहे. हे घर 27.74 चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळात (built-up area) आणि 23.74 चौरस मीटर चटई क्षेत्रफळात (carpet area) उपलब्ध आहे. या प्रकारची एकूण 3 घरं उपलब्ध आहेत. त्यामुळे, जर तुम्ही खरंच उत्सुक असाल, तर लवकरात लवकर अर्ज करा. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याला 11 सप्टेंबर 2025 या दिवसापासून सुरुवात झाली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 ही आहे.
येथे वाचा – मुंबईत लॉटरीशिवाय घ्या म्हाडाचे घर… पण कोणत्या लोकेशनवर? येथे लगेच जाणून घ्या..
अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या पुणे म्हाडाच्या लॉटरीत सर्वात स्वस्त घर हे 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेमध्ये असून हे घर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA च्या हद्दीत आहे. या योजनेचे नाव रोहन आनद फेज 1 असे असून याचा संकेतांक क्रमांक 813-ए/बी हा आहे. या योजनेत 1RK आणि 1BHK प्रकारची EWS/LIG घरे सोमाटणे येथे उपलब्ध आहेत.
या घरांची किंमत अंदाजे 9.95 लाख ते 12.03 लाख इतकी आहे. घरांचे बांधकाम क्षेत्र 34.61 ते 41.87 चौ.मी. तर चटई क्षेत्र 23.60 ते 29.02 चौ.मी. आहे. या योजनेत एकूण 64 घरे उपलब्ध आहेत.
तुम्ही म्हाडाच्या या लॉटरीबद्दल अधिक माहिती शोधत असाल, तर त्यांच्या अधिकृत वेबसाइटला नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला लॉटरीची संपूर्ण जाहिरात पाहायला मिळेल. जर तुम्हाला जाहिरातीची थेट PDF कॉपी हवी असेल, तर तुम्ही Pune MHADA Lottery 2025 notification pdf या लिंकवर क्लिक करू शकता.
तुम्ही म्हाडाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील घरांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर म्हाडाने या घरांच्या वितरणासाठी bookmyhome.mhada.gov.in ही एक नवीन वेबसाइट सुरू केली आहे. याआधी वापरली जाणारी lottery.mhada.gov.in ही वेबसाइट तर आहेच.
या दोन्ही वेबसाइटवर उपलब्ध असलेली घरं ही म्हाडाच्या सोडतीमध्ये (lottery) मागणी नसल्यामुळे शिल्लक राहिलेली आहेत. त्यामुळे, या घरांसाठी म्हाडा आता वेगळी जाहिरात देणार नाही.