मुंबईकरांनो, संधीचं सोनं करा! अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, तब्बल 12 हजार घरांची योजना..!

CIDCO Housing Scheme : घरांच्या वाढत्या किमतींमुळे मोठ्या शहरांत स्वतःचं हक्काचं घर मिळवणं अनेकांसाठी कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत सिडको आणि म्हाडाच्या गृहनिर्माण योजना (Mhada housing scheme) घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहेत. परवडणाऱ्या दरात आणि गरजेनुसार क्षेत्रफळाची घरं देणाऱ्या या संस्थांनी आतापर्यंत अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. आता नवी मुंबईत (Navi Mumbai) सिडको पुन्हा एकदा नव्या गृहनिर्माण योजनेच्या तयारीत असल्याचं समजत आहे.

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सिडको एक नवीन गृहसोडत योजना आणणार असल्याची चर्चा आहे. या योजनेसाठी (CIDCO Housing Scheme) सिडकोने तयारीही सुरू केली आहे. नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतील उपलब्ध घरांसह सुमारे 12,000 घरांचा समावेश या योजनेमध्ये असणार, असा अंदाज संबंधित विभागातील सूत्रांनी वर्तवला आहे.

सिडकोसमोर आता मोठं आव्हान!

सामान्य माणसाला परवडणाऱ्या किमतीत हक्काचं घर मिळावं, या उद्देशाने सिडको हजारो घरांची सोडत आणण्याच्या तयारीत आहे. पण त्याचवेळी मागील योजनांना मिळालेला कमी प्रतिसादही डोकेदुखी ठरतोय. नुकत्याच जाहीर झालेल्या 26 हजार घरांच्या योजनेतही असंच काहीसं झालं. रेल्वे स्थानक, बाजारपेठ यासारख्या सोयी जवळ असून देखील बऱ्याच घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाहीये.

घरांच्या जास्त किमतींमुळे अनेकांनी सोडतीत निवड झाली तरी घरांकडे पाठ फिरवली आहे. या योजनेला केवळ 18,000 ग्राहकांनीच प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे तब्बल 7,000 घरं विक्रीशिवाय पडून राहिली. उपलब्ध माहितीनुसार, यातील बहुतांश घरे तळोजा नोडमधील आहेत, आणि मागील गृहयोजनेतीलही बरीच घरे विविध कारणांमुळे विकली गेली नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेता, सिडको आता या शिल्लक घरांसह काही नवीन घरांचा समावेश करून सुमारे 12,000 घरांची नवी योजना जाहीर करू शकते.

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ही योजना जाहीर झाल्यास, त्यासाठी नोंदणी सिडकोच्या अधिकृत वेबसाइटवरून करता येईल. योजनेच्या जाहीर होण्याबरोबरच आवश्यक कागदपत्रं आणि सविस्तर माहिती सिडकोकडून उपलब्ध होईल. त्यामुळे, घर घ्यायचं स्वप्न बघणाऱ्या अनेकांना आता अक्षय्य तृतीयेची उत्सुकता लागली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

2 thoughts on “मुंबईकरांनो, संधीचं सोनं करा! अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, तब्बल 12 हजार घरांची योजना..!”

Leave a Comment