MHADA Home: नमस्कार मित्रांनो, स्वतःचं हक्काचं घर घेणं, हे जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठं स्वप्नं असेल. विशेषतः मुंबईच्या आसपास घर घेणं ही बऱ्याच लोकांची इच्छा असते. पण जेव्हा आपण ठाण्यासारख्या शहरात घर घेण्याचा विचार करतो तेव्हा तेथील घरांच्या किंमती बघूनच आपलं पाऊल मागे पडतं. पण मित्रांनो, आता हीच एक गोष्ट बदलणार आहे. कारण, म्हाडा आता सर्व सामान्य लोकांसाठी एक नवा निर्णय, एक नवी सुवर्णसंधी घेऊन आले आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे अनेक लोकांचं ठाण्यात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होऊ शकतं.
ठाणेकरांसाठी दिलासा
ठाण्यामध्ये घर घेण्याचा विचार करत असणाऱ्या नागरिकांसाठी ही बातमी अतिशय सुखद ठरू शकते कारण म्हाडाच्या कोकण मंडळाद्वारे शिरढोण आणि खोणी या ठिकाणच्या गृहप्रकल्पांतील एकूण ६,२४८ घरांच्या विक्री किंमतीमधे खूप मोठी कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आणि आता म्हाडाच्या या निर्णयामुळे नागरिकांना (MHADA Lottery 2025) फक्त १९ लाख रूपयांच्या किंमतीमध्ये ठाण्यात घर घेता येणार आहे.
आता म्हाडा देणार 20 हजार रुपये भाडे, 400 घरेही उपलब्ध करून देणार..
किंमतीत कपात का केली गेली?
सध्याची परिस्थिती बघितली तर घरांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की, सर्व सामान्य नागरिक घर घेण्याचं फक्त स्वप्नच बघू शकतो. आणि हीच परिस्थिती ओळखून म्हाडाने ठाण्यामधे परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
म्हाडाचे अधिकारी काय म्हणाले?
म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी म्हाडा द्वारे घेतलेल्या या निर्णयाबद्दल माहिती देत सांगितलं की “कोकण मंडळाच्या मौजे शिरढोण आणि मौजे खोणी या ठिकाणी एकूण ६,२४८ सदनिका उभारण्यात येत आहेत. तसेच या सर्व सदनिकांच्या सुधारित विक्री किमतीला मंजुरी दिली गेली असून, त्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात येतील असा प्रयत्न आहे.
खुशखबर! आता रेशन कार्ड असेल तर मिळणार महिन्याला 1000 रुपये, पहा अर्ज करण्याची सोपी पद्धत..!
घरांच्या सुधारित किंमती किती आहेत?
या घरांच्या सुधारित किंमतीबाबत बोलायचं झालं तर
शिरढोणमधील फ्लॅट्सच्या किंमतीमध्ये एकूण १,४३,४०४ रूपयांची कपात केली असून, खोणी मधील फ्लॅट्स च्या किंमतीत १,०१,७०० रूपयांची कपात झाली आहे. यानुसार शिरढोणमधील फ्लॅटची नवी किंमत ही १९,२८,७४२ रूपये, तर खोणीमधील फ्लॅटची नवी किंमत १९,११,७०० रूपये इतकी झाली आहे.
या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २० डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा कोकण मंडळाकडून, जुलै महिन्यात, तब्बल ४ हजार घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू असल्याचं समजून येत आहे. यामध्ये खासगी विकासकांकडून कल्याण येथील सुमारे २,५०० घरं मिळणार असून, उर्वरित घरं ही ठाण्यातील असणार आहेत.
How Wii I get lottery ticket and how much I have to pay for ticket
ठाणे कल्याण येथे म्हाडा घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी काय कागदपत्रे लागतात, दिव्यांगान म्हाडा घरांसाठी काही सवलती आहेत काय.