आता म्हाडा देणार 20 हजार रुपये भाडे, 400 घरेही उपलब्ध करून देणार..

मुंबई : पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये आणि रहिवाशांना सुरक्षित निवारा मिळावा, यासाठी म्हाडाने (Mhada) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी जर स्वतःहून राहण्याची दुसरी व्यवस्था केली, तर त्यांना महिन्याला 20 हजार रुपये भाडे म्हणून देण्यात येणार आहे. तसंच, या इमारतींमधील अन्य रहिवाशांसाठीही भाड्याने राहता येईल अशी सोय करून देण्यात येणार असून, 180 ते 250 चौरस फुटांच्या सुमारे 400 घरे त्यासाठी उपलब्ध करून दिली जातील. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.(MHADA will pay Rs 20,000 as rent, will also provide 400 houses)..

यंदा म्हाडाने मुंबईतील तब्बल 96 इमारतींना अतिधोकादायक जाहीर केलं आहे. या इमारतींमध्ये सध्या सुमारे 2400 भाडेकरू वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवणं अत्यावश्यक ठरत आहे. मात्र सध्या उपलब्ध शिबिरांमध्ये केवळ 786 घरेच उपलब्ध असल्याने ही संख्या अपुरी पडत आहे. दरम्यान, मुंबई शहर जिल्ह्यात सध्या 13,091 उपकरप्राप्त इमारती अस्तित्वात आहेत. तर म्हाडाकडे एकूण 20,591 संक्रमण घरे उपलब्ध असून त्याचा वापर धोका टाळण्यासाठी केला जात आहे.

येथे वाचा – खुशखबर! आता म्हाडाचे घर झाले स्वस्त, येथे पहा नवीन किमती..!

या रहिवाशांसाठी पुढील तीन वर्षांकरिता 180 ते 250 चौरस फूट क्षेत्रफळाची सुमारे 400 घरे भाडे तत्वावर उपलब्ध करून घेण्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी होणारा खर्च पुनर्विकास करणाऱ्या खासगी बिल्डरांकडून किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून वसूल केला जाणार आहे.

Leave a Comment