मुंबईकरांसाठी खुशखबर! आता स्वस्तात मिळणार म्हाडाची दुकाने, पहा या दिवशी येणार जाहिरात..!

Mhada Scheme Mumbai : मुंबईसारख्या शहरात स्वतःचे दुकान असावे असं अनेक व्यावसायिकांचं स्वप्न असतं. दरवर्षी वाढणाऱ्या भाड्यांच्या तुलनेत, स्वतःच्या दुकानातून व्यवसाय करणे अधिक स्थिर आणि फायदेशीर ठरते. त्यासाठी स्वतःचे दुकान असणे खूपच आवश्यक आहे. अशा वेळी म्हाडाची दुकान योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. म्हाडाच्या दुकान योजनेतून वेगवेगळ्या ठिकाणच्या दुकानांचा लिलाव केला जातो. अशात आता म्हाडा योजनेतून (Mhada Scheme) स्वतःचे दुकान घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील म्हाडाच्या 149 एवढ्या दुकानांचा ई-लिलाव लवकरच होणार आहे. सोमवारी म्हाडाचे उपाध्यक्ष यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने आता लिलाव प्रक्रियेला अधिकृत सुरूवात होणार आहे. येत्या काही दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होऊन नोंदणी, अर्जविक्री आणि अर्ज स्वीकृती यासारख्या महत्त्वाच्या टप्प्यांना सुरुवात होणार आहे. महागड्या किमतीमुळे याआधी विक्री न झालेल्या 124 दुकानांच्या किंमतीत आता मोठी घट करण्यात आली आहे. यापूर्वी निवासी रेडीरेकनर दराच्या दोनपट दराने ही दुकाने विक्रीस होती, पण आता ही किंमत दीडपट इतकी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना अगदी परवडणाऱ्या किमतीत दुकान खरेदी करण्याची मोठी संधी मिळणार आहे. 

म्हाडाचे गृहप्रकल्प केवळ घरापुरतेच मर्यादित नसतात, तर तिथे राहणाऱ्या नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक सुविधा जसे की पिठाची गिरणी, बँक, भाजी मार्केट, दुकाने, मेडीकल या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी म्हाडा (Mhada) काही दुकानेही बांधते. ही दुकाने ई-लिलावाच्या माध्यमातून विक्रीस काढली जातात. प्रत्येक दुकानासाठी मंडळाकडून एक प्राथमिक बोली दर निश्चित केला जातो, आणि त्या तुलनेत सर्वाधिक बोली लावणाऱ्या अर्जदारालाच ते दुकान मिळते. आतापर्यंत अशा प्रकारे शेकडो दुकानांचे ई-लिलाव मुंबई मंडळाने यशस्वीरित्या पार पाडले आहेत. मागील वर्षी म्हणजेच जून 2024 मध्ये मुंबई मंडळाकडून 173 दुकानांचा ई-लिलाव करण्यात आला होता. मात्र अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. त्या लिलावात केवळ 49 दुकानेच विकली गेली, तर तब्बल 124 दुकाने विक्रीशिवायच राहिली.

मुंबई मंडळाने रिक्त पडलेली दुकाने तसेच पवईसह दुसऱ्या एका ठिकाणची मिळून एकूण 149 दुकाने ई-लिलावात काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नव्याने उपलब्ध झालेली 25 दुकानेही समाविष्ट आहेत. या लिलावासाठीचा प्रस्ताव म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला होता. सोमवारी त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे.

मुंबईतील 149 दुकानांपैकी मागीलवेळी विक्री न झालेल्या 124 दुकानांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. यामागचे खरे कारण म्हणजे त्यांची ठरवलेली जास्त बोली किंमत असण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. यामुळे यंदा काही प्रमाणात दरामध्ये कपात करण्यात आली आहे.  यंदा 124 दुकानांसाठी निवासी मालमत्तेच्या रेडीरेकनर दराच्या दीडपट दर लावून बोली दर ठरवण्यात आला आहे, असे देखील बोरीकर यांनी स्पष्ट केले. यंदा दर कमी झाल्यामुळे दुकाने विकली जातील, असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला.

बिंबिसारनगरसह काही ठिकाणांवरील दुकाने ठराविक उपयोगांसाठीच राखीव ठेवण्यात आली होती. जसे की बँक, एटीएम, जिम, कर्तनालय वगैरे.. त्यामुळे दुकानाच्या वापरावर असलेली ही मर्यादा लक्षात घेता, इच्छुकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. ही अट हटवली जात असल्याने आता दुकाने कोणत्याही व्यावसायिक उपयोगासाठी घेता येणार आहेत. या 149 दुकानांच्या ई-लिलावाला मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून नोंदणी, अर्जविक्री आणि अर्ज स्वीकृती या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

ही दुकाने नेमकी कुठे आहे?

ही दुकाने गव्हाणपाडा, मालवणी, चुनाभट्टी, तुंगा पवई, कोपरी पवई, चारकोप, जुने मागाठाणे, महावीर नगर, प्रतीक्षा नगर आणि बिंबिसार नगर अशा विविध भागांमध्ये आहेत. यामध्ये 125 चौरस फूटांपासून ते 1500 चौरस फूटांपर्यंतच्या आकाराची दुकाने समाविष्ट आहेत.

8 thoughts on “मुंबईकरांसाठी खुशखबर! आता स्वस्तात मिळणार म्हाडाची दुकाने, पहा या दिवशी येणार जाहिरात..!”

  1. दुकान मिळेल का
    माजा फोन no 7259839872

    Reply
  2. Дизайнерская мебель премиум класса — это воплощение изысканного стиля и безукоризненного качества.

    Выбор дизайнерской мебели требует особого подхода. Желательно консультироваться с экспертами в области дизайна, чтобы получить дополнительные рекомендации. Играйте с формами и стилями, чтобы подчеркнуть индивидуальность квартиры.

    Reply
  3. С получением профессиональной помощи в решении юридических вопросов вы можете обратиться к бесплатная консультация юриста по уголовным делам, где можно получить юридическую консультацию круглосуточно и бесплатно.

    В текущих условиях, сталкиваясь с правовыми проблемами, множество людей нуждаются в консультировании адвокатов.

    Reply
  4. Бесплатная юридическая консультация в Москве становится все более популярной . Это связано с растущей потребностью в правовой помощи . Специалисты готовы предоставить свои услуги безвозмездно .

    Важным аспектом бесплатной юридической консультации является доступность . Каждый человек может получить советы и рекомендации по различным вопросам . Это способствует уменьшению случаев юридических конфликтов.

    Получить бесплатную юридическую консультацию можно довольно просто . Чаще всего, чтобы получить помощь, нужно просто записаться к юристу. Некоторые юристы проводят консультации дистанционно.

    Таким образом, бесплатная юридическая помощь в Москве — это необходимый ресурс для жителей столицы. Правовая поддержка способствует повышению правосознания граждан . Не упустите возможность воспользоваться бесплатной помощью, если это вам нужно .
    здесь https://clinicianbarista.com/forums/users/ernestinehatter/

    Reply
  5. Чтобы получить профессиональную помощь в вопросах раздела имущества, обратитесь к адвокат раздел имущества, который поможет вам разобраться в вашей ситуации и защитить ваши интересы.
    Таким образом, владельцы бизнеса могут быть уверены в достоверности предоставленных сведений.

    Reply

Leave a Comment