MHADA Housing Pune : नवं घर घेण्याचं ठरलं की, सर्वात आधी पैशांचा ताळमेळ बसवणं हे काम सुरू होतं. घरासाठी मोठा पैसा लागत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी तर फारच अवघड असतं. एवढा पैसा कसा जमा करायचा असा मोठा प्रश्न उभा राहतो. अशा वेळी म्हाडा, सिडको यांसारख्या सरकारी गृहयोजना (Housing Schemes) मोठा आधार बनतात. अशात आता पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी आली आहे. आता पुणे जिल्ह्यात म्हाडाची योजना (Mhada Scheme) राबवली जाणार असून, तिच्यामुळं अनेकांना परवडणाऱ्या दरात स्वतःचं घर घेण्याची संधी मिळणार आहे. (Affordable Flats)..
आता म्हाडाचा मोठा प्रकल्प पुण्यात (Mhada Scheme Pune)
घर खरेदी करायचं स्वप्न अनेकांचं असतं, पण वाढत्या दरांमुळे ते पूर्ण करणं कठीण होतं. अशावेळी म्हाडाच्या योजना (Mhada Scheme) लोकांसाठी खूप उपयोगी ठरतात. आता पुण्यात म्हाडाचा मोठा प्रकल्प सुरू होतोय. खेड आणि मुळशी तालुक्यातील जवळपास 57 एकर एवढी सरकारी जमीन जिल्हा प्रशासनाने म्हाडाला दिली आहे. याच जमिनीवर आता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (PMAY) टप्प्याटप्प्याने तब्बल 13 हजार 301 घरं बांधली जाणार आहेत. म्हणजेच, आता पुण्यातल्या अनेकांना स्वतःचं घर मिळण्याची संधी मिळणार आहे.
पुण्यात कुठे असणार म्हाडाची घरे? (Mhada Flats Pune)
पुण्यातील रोहकल भागात तब्बल 8 हजार घरं, तर मुळशीच्या नेरे गावात 5 हजारांपेक्षा जास्त घरं बांधली जाणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 2 हजार 194 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. येत्या चार वर्षांमध्ये घरांचं काम पूर्ण करून ही घरे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून द्यायची, असा म्हाडाचा प्लॅन आहे. त्यामुळे आता पुणेकरांना लवकरच म्हाडाचे घर घेण्याची संधी तुम्हाला मिळत आहे.
म्हाडाच्या 5 हजार घरांसाठी तब्बल एवढे अर्ज
म्हाडाने ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि पालघरमधील वसई परिसरात मोठी गृहयोजना आणली आहे. या योजनेत एकूण 5 हजार 285 घरं आणि काही भूखंडांचा समावेश आहे. या घरांसाठी लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. 25 ऑगस्टपर्यंत तब्बल 1 लाख 25 हजार 397 अर्ज आले आहेत. त्यातल्या 89 हजारांपेक्षा जास्त अर्जदारांनी अनामत रक्कमसुद्धा भरली आहे.
येथे वाचा – तयारीला लागा! सिडकोची महा लॉटरी लवकरच, सरकार देणार कमी किमतीत घर..!
म्हाडाने अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ
म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांमधल्या गाळ्यांची विक्री ई-लिलावाद्वारे केली जाणार आहे. यासाठीच नवं म्हणजेच सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. आता ई-लिलावासाठी नोंदणी, ऑनलाइन अर्ज भरणं, कागदपत्रं अपलोड करणं आणि अनामत रक्कम भरण्यासाठीची अंतिम तारीख 8 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच, ज्यांचा अर्ज करायचा राहून गेला होता, त्यांच्यासाठी अजूनही काही दिवसांची संधी उपलब्ध आहे.
प्रश्न – MHADA च्या नवीन योजनेत खास काय आहे?
उत्तर – पुणे जिल्ह्यातील लोकांसाठी म्हाडाने (MHADA) आता मोठा गृहप्रकल्प आणला आहे. या योजनेत तब्बल 13 हजार 301 परवडणारी घरं बांधली जाणार असून ज्यांना स्वतःचं घर घेणं अवघड वाटत होतं, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.
प्रश्न – या प्रकल्पासाठी जमीन कुठून मिळाली?
उत्तर – या मोठ्या प्रकल्पासाठी खेड आणि मुळशी तालुक्यातील जवळपास 57 एकर सरकारी गायरान जमीन जिल्हा प्रशासनाने म्हाडाकडे दिली आहे. म्हणजेच, आता या जागेवरच हजारो परवडणारी घरे (Affordable Flats) उभी राहणार आहेत.
प्रश्न – ही घरे नेमकी कुठे बांधली जाणार आहेत?
उत्तर – घरं दोन ठिकाणी उभारली जाणार आहेत. खेड तालुक्यातल्या रोहकल गावात तब्बल 8 हजार घरे बांधली जातील, तर मुळशी तालुक्यातल्या नेरे गावात 5 हजार 301 हून अधिक घरे उभारली जाणार आहेत. म्हणजेच, दोन्ही भागात हजारो कुटुंबांना स्वतःचं घर मिळण्याची संधी मिळणार आहे.