खुशखबर! अवघ्या 5 लाखात म्हाडाचे घर, म्हाडाचे लॉटरी जाहीर, पहा लोकेशन आणि बरंचं काही..!

स्वतःचं एक छोटंसं का होईना, पण हक्काचं घर असावं, असं स्वप्न आपल्या प्रत्येकाच्या मनात शंभर टक्के असतं. मात्र सध्याच्या वाढत्या महागाईमुळे शहरात घर घेणं अनेकांच्या आवाक्याबाहेरचं झालंय असं दिसून येतंय. पण आता अतिशय कमी बजेटमध्ये तुम्ही पाहिलेले घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाने तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर दिली आहे. अवघ्या 5 लाखात म्हाडाचे घर (Mhada Flat) मिळणार आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलंय! आता फक्त 5 लाख रुपयांमध्ये तुम्हाला मिळू शकतं तुमचं स्वतःचं घर आणि विशेष म्हणजे या स्वस्त घरांसाठी लॉटरी (Housing Lottery) देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही जर अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटात असाल तर तुमच्यासाठी अवघ्या 5 लाखात घर उपलब्ध होणार आहे. या घरांसाठी अर्ज कुठे करावा लागणार? आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? तसेच या म्हाडाच्या घरांचे लोकेशन कुठे आहे? याचे बद्दल माहिती जाणून घेऊया.

म्हाडाच्या या योजनेतली सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी ही घरे अगदी परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहेत. विशेष म्हणजे ही घरे केवळ 5 लाख रुपयांपासून सुरू होत आहेत.

अर्ज कुठे करावा? आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

म्हाडाच्या या घरांसाठी अर्ज प्रक्रिया 30 जूनपासून सुरू झाली आहे. ज्यांना अर्ज करायचा आहे, त्यांना 11 ऑगस्टपूर्वी अर्ज दाखल करावा लागेल. कारण 11 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी म्हाडाचं अधिकृत संकेतस्थळ https://housing.mhada.gov.in वर जाऊन अर्ज करता येईल.

म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी नवीन घरांची लॉटरी (New Housing Lottery) जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 1351 घरे तर नाशिक विभागात 1485 घरे उपलब्ध होणार आहेत.

नाशिकमध्ये घरं कितीला मिळणार?

अल्प उत्पन्न गटातील (LIG) लोकांसाठी नाशिकमध्ये घर घेण्याची मोठी संधी आहे. 12.68 लाख ते 13.55 लाख रुपयांच्या दरम्यान ही घरे उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे ही सर्व घरे वडाळा शिवारमधील ‘पार्श्वनाथ प्रोजेक्ट’ या ठिकाणी मिळणार आहेत.

अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी नाशिकमध्ये आणखी पर्याय उपलब्ध!

अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी नाशिकमधील अडगाव शिवारमधील ‘प्रणव गार्डन’ या प्रोजेक्टमध्येही घरे मिळणार आहेत. या घरांची किंमत अंदाजे 11.94 लाख ते 15.31 लाख रुपयांच्या दरम्यान असेल अशी माहिती मिळाली आहे.

तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी घरे अहिल्यानगरमधील सिव्हिल हुडको आणि सावेदी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या घरांची किंमत फक्त 5.48 लाख रुपये इतकी आहे, जी सहज परवडणारी आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये घर घेण्याची संधी – विविध भागांत विविध किमतीत घरे उपलब्ध..

छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनेक भागांमध्ये घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये वेगवेगळ्या परिसरांनुसार घरांच्या किमतीही वेगवेगळ्या आहेत:

नक्षत्रवाडी येथे सर्वाधिक, म्हणजे 1056 घरे उपलब्ध असून, यांची किंमत सुमारे 15.30 लाख रुपये आहे. चिखलठाणा भागात 158 घरे असून त्यांची किंमत 27 लाख रुपये एवढी आहे. देवळाई या लोकेशनवर 14 घरे उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 13.19 लाख ते 16.19 लाख रुपये दरम्यान आहे. आनंद पार्कमध्ये कमी बजेटमध्ये घरे शोधणाऱ्यांसाठी खास संधी आहे. इथे 18 घरे असून किंमत फक्त 4.85 लाख ते 6.27 लाख दरम्यान आहे. तसेच चिखलठाण्यातील दुसऱ्या प्रकल्पात आणखी 6 घरे उपलब्ध असून त्यांची किंमत थेट 34 लाख रुपये इतकी आहे. बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई येथे 92 एवढी घरे आहे आणि त्याची किंमत 10.65 लाख रुपये इतकी असल्याची माहिती मिळाली आहे.

4 thoughts on “खुशखबर! अवघ्या 5 लाखात म्हाडाचे घर, म्हाडाचे लॉटरी जाहीर, पहा लोकेशन आणि बरंचं काही..!”

Leave a Comment