मुंबईत लॉटरीशिवाय घ्या म्हाडाचे घर… पण कोणत्या लोकेशनवर? येथे लगेच जाणून घ्या..

Mhada Flats Mumbai : शहरात स्वतःचं घर असावं, असं स्वप्न जवळजवळ प्रत्येक जण बाळगतो. कारण शहरातील जीवनाचे आकर्षण प्रत्येकाला असते. पण सतत वाढणाऱ्या घरांच्या किमतीमुळे हे स्वप्न पूर्ण करणं खरंच कठीण होतं चाललं आहे. अशावेळी म्हाडाच्या योजना (Mhada Scheme) गोरगरीब लोकांसाठी म्हणजेच मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक मोठा आधार ठरतात. कारण म्हाडाची घरं केवळ परवडणाऱ्या दरातच मिळत नाहीत, तर ती शहरातील सोयीच्या ठिकाणी आणि चांगल्या बांधकामासह उपलब्ध करून दिली जातात. अलीकडेच आता एक मोठी बातमी आली आहे, मुंबईत म्हाडाची घरे (Mhada Flats Mumbai) लॉटरीशिवाय घेता येणार आहे.

म्हाडाचं घर म्हटलं की सर्वात आधी लॉटरीची आठवण येते. कारण म्हाडाची घरे लॉटरीच्या माध्यमातून मिळतात. त्यात पण म्हाडाचे घर लॉटरीत लागेल की नाही, याची चिंता नेहमीच सतावत असते. पण आता तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. आता तुम्हाला म्हाडाचे घर (Mhada Flat) मिळवण्यासाठी लॉटरीची गरज नाहीये. तुम्ही आता लॉटरीशिवाय म्हाडाचे घर घेऊ शकता. म्हणजेच, कुठली लॉटरी नाही आणि कुठलीही प्रतीक्षा नाही. थेट प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावरती तुम्हाला घर घेण्याची संधी मिळणार आहे. म्हाडाची ही घरी नेमकी कुठे मिळणार? आणि त्यांची किंमत काय आहे? याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया..

आता म्हाडाचे घर घेण्यासाठी लॉटरीची वाट पाण्याची गरज नाही. मुंबईतील ताडदेव परिसरातील काही घरं, जी अजून विकली गेली नाहीत, ती थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. या घरांच्या किंमती 6 ते 7 कोटी रुपयांपर्यंत असून, त्यांची विक्री “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ” या तत्त्वावर होणार आहे. म्हणजेच, अर्ज करणाऱ्याला लॉटरीची चिंता न करता थेट घर घेण्याची संधी मिळणार आहे.

येथे वाचा – खुशखबर! आता पुण्यात नवीन म्हाडाची घरं मिळणार, येथे पहा घरांचे लोकेशन..!

ताडदेवमधील म्हाडाच्या या घरांचा दोन वेळेस लॉटरीमध्ये समावेश करण्यात आला होता. पण आश्चर्य म्हणजे, ती घरे विकलीच गेली नाहीत.  त्यामुळे म्हाडाचे तब्बल 50 ते 55 कोटी रुपये एका इमारतीतच अडकून पडले आहेत. याच कारणामुळे आता म्हाडाने या घरांची विक्री लॉटरीशिवाय करण्याचा विचार पुढे आणला आहे. मात्र, यासाठी अंतिम निर्णय म्हाडा प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच होणार आहे. म्हणजेच, लवकरच या महागड्या घरांच्या विक्रीसाठी नवा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या गृहनिर्माण धोरणानुसार, कोणताही गृह प्रकल्प (housing project) उभारताना विकासकांनी काही ठराविक घरे म्हाडाला देणं बंधनकारक असतं.  त्याच नियमांतर्गत ताडदेव परिसरातील 8 घरे म्हाडाकडे आली होती. या घरांसाठी म्हाडाकडून दोन वेळा लॉटरी काढण्यात आली होती. मात्र आश्चर्य म्हणजे ती घरे विकलीच गेली नाहीत. त्यामुळे ही महागडी घरे अजूनही रिकामीच पडून आहेत आणि म्हाडाला त्यांची विक्री करण्यासाठी नवे पर्याय शोधावे लागत आहेत.

म्हाडाने ही घरे आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवासासाठी देण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र तोही यशस्वी ठरला नाही. शेवटी, या घरांचा प्रश्न सुटावा म्हणून आता त्यांची विक्री “पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य” या तत्त्वावर करण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

घरांसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार

या घरांची संख्या मर्यादित असल्याने आणि किंमतीदेखील निश्चित केल्या असल्यामुळे, त्यांची विक्री “पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य” या तत्त्वावर केली जाणार आहे. घर हवे असल्यास इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल.

Leave a Comment