म्हाडाचं घर मिळाल्यावर लगेच भाड्याने देता येतं का? पहा महत्वाचा नियम..! 

mhada flat rental rule : मुंबईसारख्या महागड्या शहरात घर घेणं ही अनेकांसाठी अशक्य वाटणारी गोष्ट असते. पण आता परवडणाऱ्या किंमतीत घर मिळणे शक्य झाले आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर, ठाणे जिल्हा तसेच वसई (पालघर) या भागांमध्ये वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनांतर्गत तब्बल 5,285 एवढ्या सदनिका, तसेच ओरोस (जि. सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. या योजनेसाठी इच्छुक अर्जदारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट असून रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करत असताना अनेकांना एक प्रश्न नेहमी पडतो, म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर आम्ही भाड्याने देऊ शकतो का? याची माहिती आपण खाली जाणून घेतली आहे.

कोकण गृहनिर्माण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या सोडतीत घर मिळवण्याची चांगली संधी यंदा उपलब्ध झाली आहे. ही संपूर्ण सोडत पाच वेगवेगळ्या योजनांमध्ये विभागली असून, त्याअंतर्गत विविध प्रकारच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश आहे. कोणत्या योजनेत किती सदनिका व भूखंड उपलब्ध आहे? याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

येथे वाचा – म्हाडाचा फॉर्म भरायचा? तर मग या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा, पहा एका क्लिक वर..!

(1) सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (20%)

– 565 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

(2) एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना (15%)

– 3 हजार 2 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

(3) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना

– 1 हजार 677 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

(4) 50 टक्के परवडणाऱ्या घरांसाठी राखीव योजना

– 41 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

(5) भूखंड विक्री योजना

– 37 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

येथे वाचा – सुवर्णसंधी! नवी मुंबईत फक्त 14 लाखांपासून म्हाडाचे घर, पहा लोकेशननुसार सर्व घरांच्या किमती..!

म्हाडाच्या लॉटरीत घर लागले तर ते भाड्याने देता येईल का?

हा प्रश्न अनेक जणांना पडतो आणि बरेच लोक हा प्रश्न आम्हाला विचारतात. याचे उत्तर आहे – होय, पण यासाठी काही अटी आहे. चला जाणून घेऊया.

म्हाडाच्या लॉटरीत मिळालेलं घर खरेदीच्या तारखेपासून ते 5 वर्षांपर्यंत विकता येत नाही, हे तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र, या काळात तुम्ही ते भाड्याने देऊ शकता.

फक्त लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला म्हाडाकडून अधिकृत ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घ्यावं लागतं. त्यानंतर तुम्ही घर भाड्याने देऊ शकता.

NOC मिळवण्यासाठी काही शुल्क लागते, आणि ते मालकाच्या उत्पन्नानुसार ठरते. हा शुल्क 2000 ते 5000 रुपयांदरम्यान असतो.

Leave a Comment