लाडक्या बहिणींना 7 वा हप्ता मिळणार की नाही? सरकारकडून मोठी अपडेट समोर!

सध्या महाराष्ट्रात सुमारे 2 कोटी 47 लाख महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. जुलैपासून आतापर्यंत 6 हप्ते(Ladki Bahin Installment) त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता एप्रिल महिना संपायला आला असतानाही 7 वा हप्ता मात्र जमा झालेला नाहीये. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, अनेकजण सातत्याने सरकारकडे यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा पुढचा हप्ता कधी येणार, याकडे सध्या सर्व पात्र महिलांचे लक्ष लागले आहे. अनेक महिला खात्यात पैसे जमा झालेत का हे पाहण्यासाठी थेट बँकेत जाऊन रांगेत उभ्या राहत आहेत. मात्र, एप्रिलचा हप्ता अद्यापही सरकारकडून दिला गेलेला नाही. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाची माहिती दिली आहे.(Ladki Bahin 7th Installment).

जुलैपासून महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. सरकारने काही इतर अटींसह ही योजना लागू केली असून, त्या निकषांनुसार सध्या जवळपास 2 कोटी 47 लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेतून जुलैपासून आतापर्यंत सहा हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. एप्रिल महिना संपत आला तरी अजून सातवा हप्ता जमा झालेला नाही, त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सातवा हप्ता कधी येणार याबाबत सरकारकडे वारंवार विचारणा केली जात आहे.

महिलांना पुढील हप्ता कधी मिळणार?

यासंदर्भात आज महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “एप्रिल महिना संपण्याआधी पात्र महिलांच्या खात्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ जमा केला जाईल.” मात्र, त्यांनी याबाबत कोणतीही ठोस तारीख जाहीर केलेली नाही.

आता एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत आणि त्यामुळेच हप्ता कधी जमा होणार यावर चर्चांना उधाण आलं आहे. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी (अक्षय तृतीयाच्या दिवशी) हा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थींना आता 30 एप्रिलपर्यंत थांबावं लागेल असं दिसतंय.

या योजनेचे नियम बदलणार आहेत का?

याच मुद्द्यावर आज महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “सुरुवातीपासून या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत. अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या अटीत कोणताही बदल झालेला नाही. शासननिर्णयात हे स्पष्टपणे नमूद आहे.”

येथे वाचा – खुशखबर! म्हाडाच्या घरांचा ‘फॉर्म्युला’ बदलणार! मुंबईतील घर घेणे आता सर्वांना परवडणार..!

Leave a Comment