फायद्याची बातमी! या 3 स्मार्ट ट्रिक्समूळे होम लोन लवकर संपून वाचतील लाखो रुपये, एकदा पहाच..!

Home Loan : मंडळी, कोणाला नाही वाटत स्वतःचं हक्काचं घर असावं? जेव्हा घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होतं, तेव्हा सगळ्यांचा आनंद गगनात मावत नाही. पण खरं सांगायचं तर, घर घेताना बऱ्याच जणांना गृहकर्ज (Home Loan) घ्यावं लागतं. आणि हे गृह कर्ज तब्बल 20 ते 30 वर्षांसाठी असते. आणि विचार करा, तुमचा महिन्याच्या पगारातला जवळपास निम्मा हिस्सा फक्त EMI भरण्यासाठीच जातो. मग कधी कधी असं वाटायला लागतं, “हा हप्ता कधीपर्यंत भरायचा?” हाच विचार सारखा तणाव देत असतो.

मंडळी, समजा तुम्ही 50 लाखांचं गृहकर्ज घेतलं. तर परतफेडीच्या शेवटी बँकेला जवळपास तितकीच रक्कम व्याज म्हणून तुम्हाला भरावी लागते. आता हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण काळजी करू नका. कारण काही स्मार्ट उपाय आहेत ज्यामुळे तुम्ही हे गृह कर्ज काही वर्षांतच पूर्ण फेडू शकता. त्यात व्याज म्हणून जाणारे लाखो रुपये तुमच्या खिशातच राहतील. चला, जाणून घेऊया तीन सोपे आणि स्मार्ट उपाय.

(1) दर महिन्याला हे काम करा

दर महिन्याला EMI थोडी वाढवणं हा गृहकर्ज फेडायचा एकदम सोपा आणि स्मार्ट उपाय आहे, जो की सर्वांना माहिती आहे. पण आपण यापेक्षाही अजून चांगले पर्याय खाली बघितले आहे.

मंडळी, जर तुमचा EMI 40,000 रुपये असेल, तर 45,000 रुपये दर महिन्याला भरण्याचा प्रयत्न करा. यामुळे वाढवलेल्या 5 हजार रुपयांमुळे तुमची कर्जाची मुद्दल रक्कम कमी होईल. मुद्दल कमी झालं की त्यावरचं व्याजही कमी होतं, आणि कर्जाचा कालावधी आपोआप कमी होतो. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे तुमचा पगार दरवर्षी थोडा थोडा वाढत जातोच, तर त्या प्रमाणे तुम्ही EMI देखील थोडी थोडी वाढवली पाहिजे. हा छोटासा बदल तुम्हाला लाखो रुपयांचं व्याज वाचवून, लवकर कर्ज फेडण्यास मदत करतो.

(2) वर्षातून एकदा करा हे काम

मंडळी, वर्षातून एकदा प्रीपेमेंट करणं हा गृहकर्ज फेडायचा अजून एक छान मार्ग आहे. आपल्याकडे काय होतं? दिवाळी बोनस, इन्सेंटिव्ह किंवा एखादं एक्स्ट्रा उत्पन्न आलं की आपण लगेच गिफ्ट्स, ट्रॅव्हल किंवा इतर खर्चांमध्ये घालवतो. पण, जर ही रक्कम थेट गृहकर्जाच्या प्रीपेमेंटमध्ये टाकली, तर याचा किती मोठा फायदा होतो हे तुम्हाला माहित आहे का?

प्रीपेमेंटमधली रक्कम थेट कर्जाची मुद्दल रक्कम कमी करते. मुद्दल कमी झालं की त्यावरचं व्याजही कमी होतं. म्हणजेच, कर्जाचं ओझं लवकर कमी होतं आणि तुम्ही लवकर कर्जमुक्त होता. भारी आहे ना ही ट्रिक?

येथे वाचा – घर घ्यायचंय? तुमचा पगार पुरेल का? जाणून घ्या १० लाखांपासून १ कोटीपर्यंतच्या EMIचं गणित!

(3) गृह कर्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे

गृहकर्ज ट्रान्सफर करणं म्हणजे तुमची शिल्लक मुद्दल एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हलवणं. समजा, तुम्ही 9.5% व्याजदराने कर्ज घेतलंय, पण आता दुसरी बँक तुम्हाला 8.5% दराने कर्ज देऊ करत आहे. अर्धा टक्का किंवा एक टक्का व्याज कमी झालं तरी, दीर्घकाळासाठी पाहिलं तर लाखो रुपयांची बचत होऊ शकते.

हो, यात प्रोसेसिंग फी लागतेच, पण लाखांत बचत होत असेल तर ही फी मोजणं अगदी योग्यच आहे. मात्र लक्षात ठेवा की गृह कर्ज ट्रान्सफर करण्याचा फायदा तेव्हाच जास्त होतो जेव्हा तुमचा परतफेडीचा कालावधी किमान 5 ते 7 वर्षांचा बाकी असेल तर..

Leave a Comment