Home Loan benefits : तुम्ही हे नक्कीच पाहिलं असेल की आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतानाही ते घर घेण्यासाठी होम लोन (Home Loan) घेतात. मग असा प्रश्न मनात वारंवार येतो की इतका पैसा असूनही हे लोक होम लोन का घेतात? खरं सांगायचं तर, यामागे काही स्मार्ट कारणं असतात. होम लोन घेतल्यामुळे त्यांना अनेक फायदे मिळतात. आणि हे फायदे इतके उपयोगी असतात की त्यामुळेच पैशाची कमी नसतानाही ते होम लोन घेणं पसंत करतात. जर या सगळ्यामागचं अर्थशास्त्र तुम्ही समजून घेतलंत, तर तुम्हालाही वाटेल की “अरे, आपल्यालाही घर घेण्यासाठी होम लोन घ्यायलाच हवं!” तर चला, जाणून घेऊया होम लोन घेण्यामागचे हे खरे आणि उपयोगी फायदे…
होम लोन (Home Loan) लोकांना घर खरेदीसाठी नक्कीच मोठा हातभार लावत असतो, पण त्यासोबतच लोन फेडण्याची एक मोठी आणि दीर्घकालीन जबाबदारीही येते. कारण हे लोन दीर्घकाळ फेडावं लागतं. म्हणूनच काही लोकांना ते त्रासदायक वाटू लागतं. पण तुम्हाला माहित आहे का? होम लोन म्हणजे केवळ एक ओझं नाही, तर त्याचे खूप मोठे फायदेही आहेत. हे फायदे श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या हुशार असलेले लोक चांगलेच समजून घेतात. म्हणूनच करोडोची संपत्ती असूनदेखील ते घर खरेदीसाठी बँकेकडून होम लोन घेतात. जर तुम्हालाही हे फायदे समजले, तर आपण देखील होम लोन काढावे असं तुम्हाला नक्कीच वाटू शकतं.
(1) होम लोन घेण्याचा सर्वात पहिला आणि महत्वाचा फायदा
होम लोन घेण्याचा पहिला आणि खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण जे घर किंवा मालमत्ता खरेदी करतोय, त्यात कायदेशीरदृष्ट्या काही अडचणी आहे की नाही, याची खात्री आपोआपच होते. कारण बँका किंवा कोणतीही आर्थिक संस्था होम लोन देण्याआधी त्या मालमत्तेची सखोल चौकशी करतात. ती मालमत्ता वादग्रस्त तर नाही ना? आधीच कुठलं लोन तर त्यावर नाही ना? कागदपत्रं खरी आणि पूर्ण आहेत का? या सगळ्या गोष्टींची बारकाईने तपासणी केली जाते. म्हणूनच, जेव्हा बँक तुम्हाला लोन मंजूर करते, तेव्हा ती मालमत्ता एकप्रकारे क्लिअर असल्याची खात्रीच मिळते.
यामुळे तुम्हीही निश्चिंत राहू शकता की तुम्ही ज्या घरात गुंतवणूक करत आहात, ते कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित आहे.
(2) होम लोनचा दुसरा फायदा
होम लोनचा आणखी एक मोठा आणि उपयोगी फायदा म्हणजे कर बचत. म्हणूनच अनेक करदाते म्हणजे जे दरवर्षी आयकर भरतात, असे लोक होम लोन घेण्याकडे वळतात. कारण यामुळे त्यांना चांगली टॅक्स सवलत मिळते. तसेच, आयकर अधिनियमातील कलम 24(B) अंतर्गत, तुम्ही घेतलेल्या होम लोनवरील व्याजावर वर्षाला कमाल 2 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते. म्हणजेच, घरासाठी घेतलेल्या कर्जावर जे व्याज तुम्ही भरता, त्यावर कर सवलत मिळते.
(3) होम लोन घेण्याचा तिसरा मोठा फायदा
चला, आता तिसऱ्या फायद्याबद्दल बोलूया, होम लोनचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील व्याजदर इतर कर्जांपेक्षा खूपच कमी असतो. म्हणजे तुम्ही पर्सनल लोन (Personal loan) घ्याल, तर त्यावर खूप जास्त व्याज भरावं लागतं. पण होम लोन घेतलंत, की तुलनेत ते खूप स्वस्तात मिळतं. आता तुम्ही विचार करत असाल यात “किती फरक असतो?” तर खरंच, दोघांच्या व्याजदरामध्ये बरीच तफावत असते. आणखी एक गोष्ट म्हणजे जर भविष्यात महागाई कमी झाली, तर होम लोनचं व्याजदेखील कमी होण्याची शक्यता असते. आणि याचा थेट फायदा तुम्हालाच होतो. हप्ते हलके होतात, आणि एकूण खर्चही कमी होतो.
(4) होम लोनचा चौथा फायदा पाहिला का?
चला, आता चौथ्या फायद्याबद्दल बोलूया.. होम लोनचा अजून एक मस्त फायदा म्हणजे यावर टॉप-अप लोन (Top up loan) मिळतं. म्हणजे काय? समजा, तुम्ही एखादं जुने घर विकत घेतलं, पण आता त्यात थोडी डागडुजी करायची आहे, किचन रिनोव्हेट करायचंय, किंवा रंगकाम करायचंय… तर काय कराल?
यासाठी वेगळं लोन घेण्याची गरज नाही. तुम्ही होम लोनवर टॉप-अप लोन घेऊ शकता. म्हणजेच मूळ लोनवर थोडा अतिरिक्त रक्कम मिळवता येते, तीही कमीत कमी कागदपत्रांतून.. हे टॉप-अप लोन तुमचा गरजेचा खर्च भागवायला अगदी उपयोगी ठरतं.
येथे वाचा – आता होम लोन फक्त 7.80% पासून सुरू – पहा स्वस्तात होम लोन देणाऱ्या टॉप बँका!
(5) होम लोनचा पाचवा फायदा
जर तुमचा क्रेडिट स्कोअर (credit score) खूपच कमी झालेला असेल, तर होम लोन वेळेवर परतफेड करून तुम्ही तो सुधारू शकता. जर होम लोनसाठी को-अॅप्लिकंट (सह अर्जदार) म्हणून एखादी महिला असेल, तर तुम्हाला हे लोन थोडं स्वस्तात मिळू शकतं. अनेक बँका महिला को-अॅप्लिकंट असल्यास 0.05% कमी व्याजदराने होम लोन देतात. तसंच, जर तुम्हाला हे लोन खूप वर्षं चालवायचं नसेल, तर तुम्ही ते वेळेपूर्वी बंद (क्लोज) करू शकता. होम लोन परतफेडीच्या अटी तुलनेत लवचीक असतात. यात तुम्हाला प्रीपेमेंट (आधीच काही रक्कम फेडण्याची) किंवा फोरक्लोजर (पूर्ण लोन बंद करण्याची) सुविधा मिळते. प्रीपेमेंट केल्याने तुमच्या CIBIL स्कोअरवर सकारात्मक परिणाम होतो, कारण बँकेला हे दाखवता येतं की तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे.
येथे वाचा – संधी सोडू नका! जुलैमध्ये म्हाडाची 4 हजार घरांची लॉटरी; या महत्त्वाच्या लोकेशनवर 1173 घरे..!