आता होम लोन फक्त 7.80% पासून सुरू – पहा स्वस्तात होम लोन देणाऱ्या टॉप बँका!

Cheapest Home Loan : जर तुम्ही सध्याच्या काळात नवीन घर (New Flat) खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक उपयुक्त माहिती घेऊन आलो आहोत. या बातमीत आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल माहिती सांगणार आहोत, जिथे सर्वात कमी व्याजदरात होम लोन दिले जात आहे.(Home loan starts from 7.80 percent, top banks offering low interest).

होम लोन बद्दल बोलायचं झालं तर सध्या त्याचे दर आधीपेक्षा खूपच कमी झाले आहेत. काही बँका तर अगदी कमी व्याजदरात होम लोन उपलब करून देत आहे. तुम्हीही जर असं स्वस्तात होम लोन मिळावं म्हणून शोध घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या अशा अनेक बँका आहेत ज्या स्वस्तात लोन (Cheap Loan) देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वस्तात लोन हवं असेल तर तुमचा सिबिल स्कोअर (CIBIL score) चांगला असायलाच हवा, तरच स्वस्तात होम लोन मिळणं शक्य आहे.

तुम्हाला माहिती आहे का? सिबिल स्कोअर हा 300 ते 900 च्या दरम्यान असतो, आणि तो खरं तर तुमची क्रेडिट पात्रता दाखवतो. म्हणजे, तुम्ही आधी घेतलेलं लोन किंवा क्रेडिट कार्डचे बिल्स (Credit Card) वेळेवर भरले आहेत का, यावर हा सिबिल स्कोअर ठरतो. जेवढा स्कोअर जास्त असेल, तेवढेच स्वस्तात लोन मिळण्याची शक्यता वाढते.

सतत महागाई वाढत असल्यामुळे स्वतःचं घर घेणं सामान्य माणसासाठी खूप अवघड झालं आहे. त्यामुळे अनेकांना घराचं स्वप्न साकार करण्यासाठी होम लोनचा (Home Loan) आधार घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत सगळ्यांना कमी व्याजदरात होम लोन मिळावं, अशी अपेक्षा असते. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही बँकांची यादी (Bank List) घेऊन आलो आहोत, ज्या सध्या सर्वात कमी व्याजदराने होम लोन देत आहेत.

स्वस्तात होम लोन देणाऱ्या बँकांची यादी

संशोधनातून असे समोर आले आहे की, कॅनरा बँक सध्याच्या काळात सर्वात स्वस्त म्हणजेच कमी व्याजदराने होम लोन देत आहे. त्यासोबतच काही इतर बँका देखील 8% पेक्षा कमी दराने होम लोन देत आहेत. या लोन वर प्रति लाखासाठी तुमचा मासिक हप्ता सुमारे 824 ते 836 रुपयांच्या दरम्यान येऊ शकतो.

येथे वाचा – संधी सोडू नका! जुलैमध्ये म्हाडाची 4 हजार घरांची लॉटरी; या महत्त्वाच्या लोकेशनवर 1173 घरे..!

स्वस्तात होम लोन देणाऱ्या बँकांच्या यादीत कॅनरा बँक सध्या 7.80% या सर्वात कमी व्याजदरासह आघाडीवर आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया या तीनही बँकांचा व्याजदर 7.85% असा आहे. त्यापाठोपाठ इंडियन बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक या दोन्ही बँका 7.90% दराने होम लोन देत आहेत. तसेच बजाज हाऊसिंग फायनान्स देखील स्वस्तात होम लोन देत असून त्यांचे व्याजदर 7.99 एवढे आहे. 

महत्वाचे म्हणजे हे व्याजदर नेहमी बदलत असतात, पुढील काळात यात अजून काही बदल होऊ शकतो. त्यामुळे बँकेत जाऊन याबद्दल माहिती घेणे गरजेचे आहे.

येथे वाचा – मुंबईत घर घेणाऱ्यांची ‘या’ भागाला सर्वाधिक पसंती! तुमचं पुढचं घर याच भागात असावं का? लगेच वाचा!

Leave a Comment