घर घेणाऱ्यांसाठी RBI चं मोठं गिफ्ट; आता 30 लाख आणि 50 लाखाच्या होम लोनसाठी एवढा येईल EMI..!

Home Loan : तुम्ही होम लोन घेतले आहे किंवा घ्यायचे असेल तर मग ही गुड न्यूज तुमच्यासाठी आहे. सरकारी बँक RBI कडून होम लोन घेणाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. रिझर्व बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात (repo rates) 25 बेसिस पॉईंट्सची कपात करत तो 6 टक्क्यांवर आणला आहे. यामुळे देशभरातील कोट्यवधी कर्जदारांना महिन्याला भरावा लागणार EMI कमी होणार आहे. त्यामुळे आता होम लोन (Home Loan) घेणाऱ्यांची बल्ले बल्ले झाली आहे.

RBI चे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या बैठकीत RBI ने रेपो दर पुन्हा २५ बेसिस पॉईंट्सने कमी केला. याआधी फेब्रुवारी महिन्यात एवढीच कपात करण्यात आली होती. एकूण 50 बेसिस पॉईंट्सनी कपात झाली असल्याने आता बँकांकडून होम लोनचे आणि इतर लोनचे व्याजदर कमी करण्याची शक्यता वाढली आहे.

तुमचा EMI कमी होणार, किती फायदा होईल?

रेपो रेट (Repo rate) कमी झाल्यामुळे होम लोनवर लागणारा EMI कमी होणार आहे. याचा थेट फायदा ज्यांनी होम लोन घेतले आहे त्यांना नक्कीच होईल. खाली आपण 30 लाख आणि 50 लाख रुपयांच्या होम लोन साठी होणारा बचतीचा हिशोब पाहिला आहे –

30 लाखांच्या होम लोन वर (20 वर्षांसाठी) किती होणार बचत?

पूर्वीचा व्याजदर 8.5% होता, त्यामुळे त्यावर ₹26,035 एवढा EMI होता. आता नवीन व्याजदर 8.25% एवढा झाला आहे, त्यामुळे 30 लाखांच्या होम लोन वरील EMI मध्ये बदल होऊन तो 25,562 एवढा होईल.
म्हणजेच EMI मध्ये महिन्याला 473 रुपयांची बचत होणार आहे. आणि वर्षभरात ही बचत 5,676 रुपयांची असणार आहेत.

50 लाख रुपयांच्या होम लोनवर (20 वर्षांसाठी) एवढी होणार बचत

होम लोनचा पूर्वीचा व्याजदर 8.5% होता, त्यामुळे 50 लाख रुपयांच्या होम लोन वर 43,391 एवढा EMI यायचा. पण आता व्याज दरात बदल झाल्याने तुमचा महिन्याचा EMI देखील कमी झाला आहे. नवीन व्याजदर 8.25% झाल्याने महिन्याला 42,603 EMI येणार आहे. त्यामुळे होम लोन घेणाऱ्यांची महिन्याला 788 तर वर्षाला 9,456 रुपयांची बचत होणार आहे.

येथे वाचा – मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबईतील या मोक्याच्या ठिकाणी मिळणार म्हाडाची 800 ते 2500 चौरस फुटांची घरं

रेपो रेट काय असतो? ते पहा

रेपो रेट म्हणजे RBI कडून बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा दर. जर रेपो दर वाढला तर बँकांचं कर्ज महाग होतं EMI वाढतो आणि जर रेपो दर कमी झाला तर बँकांचं कर्ज स्वस्त होतं म्हणजेच EMI कमी होतो. त्यामुळे रेपो दरात कपात होणे म्हणजे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी असते.

Leave a Comment